केंद्र सरकार आणि राज्य शासन देशातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवित असतात.या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महाज्योती फ्री टॅबलेट योजना जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे.


 

महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेसोबत मिळून इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना सुरु केली आहे.

MH-CET / IEL / NEET या परीक्षांच्या 2024-25 पूर्व तयारीसाठी इमाव (OBC), वी जा भ ज (VJNT), वि मा प्र (SBC) या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

१०वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर, मेडिकलसाठी तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेने ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण उपक्रम सुरु केला आहे.

जर तुम्हाला फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घायचा असेल तर शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आम्ही आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे आपण हा लेख जरूर वाचावा व या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा.

विशेष सूचना:

महाज्योती तर्फे JEE/NEET/MHT-CET 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना टॅब व प्रशिक्षण देण्याकरिता नोंदणी अर्ज मागविण्यात येत आहेत. परंतु अर्ज करताना काही विद्यार्थ्यांजवळ नॉन क्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखला नसल्यामुळे अर्ज भरतांना अडचणी येत आहेत असे काही विद्यार्थ्यांनी महाज्योतीला कळविले आहे. त्या करिता विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दहावीची गुणपत्रिका ज्यावेळेस मागविण्यात येईल तेव्हा विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर व अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सगळ्या विद्यार्थ्यांनी 15 मे 2023 त्यापूर्वी जाती प्रमाणपत्र, डोमेसाईल व जात प्रमाणपत्र तयार करावी.

सद्यस्थितीत खालील कागदपत्रां आधारे अर्ज करता येईल:
•फोटो
•स्वाक्षरी
•आधार कार्ड
•९वी ची गुणपत्रिका
•१० वी बोर्ड परीक्षेचं प्रवेशपत्र

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र उद्देश:

·         महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांनी इयत्ता ११वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे त्यांना ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.जेणेकरून विद्यार्थी घरी बसून स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.

·         राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

·         राज्यातील विद्यार्थ्यांचे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या सहाय्याने जीवनमान सुधारणे.

·         महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे.

·         राज्यात डिजिटली शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे

 

महाज्योती फ्री टॅबलेट योजना फायदे:

·         या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट मिळणार आहे.

·         या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज ६ GB इंटरनेट सेवा मोफत दिली जाणार आहे.

·         या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके दिली जाणार आहेत.

·         पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत JEE, NEET आणि CET ऑनलाईन कोचिंग क्लासेस ची मोफत सुविधा दिली जाणार आहे.

·         या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट चा वापर करून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.

·         टॅबलेट च्या साहाय्याने विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील.

·         या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी विविध प्रकारचे ऑनलाईन शिक्षण व कोर्से पूर्ण करू शकतील.

·         महाज्योती फ्री टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटली दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल.

·         या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.

·         या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

·         महाज्योती फ्री टॅबलेट च्या अंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी शिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके डाउनलोड करून अभ्यास करू शकतील.

·         या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःची इतर कामे सुद्धा करू शकतील

 

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे लाभार्थी:

महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.

 

आवश्यक पात्रता:

इयत्ता १०वी

शहरी भागातील विद्यार्थी

७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी
उत्तीर्ण झालेला असावा.

इयत्ता १०वी

ग्रामीण भागातील विद्यार्थी

६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी
उत्तीर्ण झालेला असावा.

 

योजनेच्या अटी:

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल.

महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्जदार विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी मध्ये सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा.

अर्जदार विद्यार्थ्यांने जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत टॅबलेट चा लाभ मिळवला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्जदार विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत कार्यरत असतील तर अशा विद्यार्थाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

खालील प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.:

  • OBC (इ मा व)
  • VJNT (वि जा भ ज)
  • SBC (वि मा प्र)

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • विज बिल
  • दहावी उत्तीर्ण मार्कशीट (ग्रामीण भागात ६० टक्के / शहरी भागात ७० टक्के)
  • विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
  • विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट
  • विद्यार्थ्याने अकरावी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्याची पावती / पुरावा.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ई-मेल
  • मोबाईल क्रमांक

अर्ज करण्यासाठी संपर्क - 9021914311

 अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

अर्ज भरण्यासाठी संपर्क :- 9021914311

(आम्ही आपला ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून देऊ)

Email ID     :- suhas.bhdakwad@gmail.com

आपण आपली आवश्यक कागदपत्रे Wahatsapp अथवा ईमेल करू शकता