आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रत रूफ टॉप सोलर योजना राबवित आहे

या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, फायदे मिळणार लाभ व कोणाला लाभ घेता येणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याच्या सविस्तर माहितीसाठी खालील लेख पूर्ण वाचावा

योजनेचे नाव रूफ टॉप सोलर योजना महाराष्ट्र
लाभार्थी घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था,निवासी कल्याणकारी संघटना,गाव, पाडा, वस्ती, दुर्गम आदिवासी जमाती
अनुदान 40%
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

 

 ⬛️ योजनेची वैशिष्ट्ये :
  • घरगुती बिलात मोठी बचत
  • घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ
  • 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 40% अनुदान
  • 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅट पर्यंत 20 टक्के अनुदान 
  • सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना 20 टक्के अनुदान
 ⬛️ पहिल्या टप्पा - राज्यातील समाविस्ट जिल्हे :
  • या योनेच लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्यात राज्याती एकूण सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे
  • प्रत्येकजिल्ह्यात 25000 सोलर सिस्टिम बसवण्यात येणार आहेत, पहिल्या टप्यात राज्यात एकूण 175000 सोलर सिस्टिम बसवण्यात येणार आहेत
  • समाविस्ट जिल्हे : पुणे, नाशिक, अकोला, नांदेड, लातूर, नागपूर आणि छ.संभाजी नगर
 ⬛️ कोणाला लाभ घेता येणार आहे ?
  • लाभार्थी वरी दिलेल्या जिल्ह्यात रहिवाशी असावा (पुणे, नाशिक, अकोला, नांदेड, लातूर, नागपूर आणि छ.संभाजी नगर)
  • लाभार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे 
  • योजनेत गरीब आणि मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना प्राधान्य असेल
 ⬛️ योजनेची फायदे 
  • या योजनेमुळे ग्राहकांचे वीज बिल कमी होईल आणि मोठ्या प्रमाणात बचत होईल.
  • या योजनेसाठी पात्र असलेले लोक त्यांच्या रिकाम्या छताचा वीज निर्मितीसाठी योग्य वापर करू शकतील
  • या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि देशात स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल.
 ⬛️ रूफ टॉप सोलारसाठी एक, दोन व तीन किलो वॅट साठी येणार खरंच व मिळणार लाभ   

 

रूफटॉप सोलर सिस्टिम क्षमता किलो वॅट मध्ये अंदाजे खर्च (रुपये) अनुदान (रुपये) प्रत्येक्ष खर्च  छतावर लागणारी जागा 
1 किलो वॅट  52000 18000 34500 100 चौ. फूट 
2 किलो वॅट  105000 36000 69000 200 चौ. फूट 
3 किलो वॅट  157000 54000 103000 300 चौ. फूट 

 

 ⬛️ आवश्यक कागदपत्रे :

1. लाभार्थी - आधार कार्ड
2. लाभार्थी - राशन कार्ड
3. लाभार्थी - वीज बिल
4. लाभार्थी - बँक पासबुक
5. लाभार्थी - मोबाईल नंबर
6. लाभार्थी - पासपोर्ट साइज फोटो


नोट :  योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा